महाराष्ट्रात खंबीर असल्यानेच राष्ट्रवादीला टार्गेट केलं जातयं : जयंत पाटील
भाजपवर निशाना साधताना पाटील यांनी, राज्यात राष्ट्रवादी खंबीर आहे. आणि यामुळेच राष्ट्रवादीला टार्गेट करण्यात येत आहे, अशी भाजपवर टीका केली. ही टीका त्यांनी सतत अजित पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेतून केली.
सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा आमदार जयंत पाटील हे त्यांच्या बोलण्याबरोबर त्यांच्या करेक्ट कार्यक्रमाबाबत ओळखले जातात. मात्र अधिवेशनात त्यांच्या वक्तव्यावरून त्यांना निलंबनासमोर जाव लागलं. तर सतत होत असलेल्या अजित पवार यांच्यावरिल टीकेवरून जयंत पाटील यांनी भाजपवर निशाना साधला आहे.
भाजपवर निशाना साधताना पाटील यांनी, राज्यात राष्ट्रवादी खंबीर आहे. आणि यामुळेच राष्ट्रवादीला टार्गेट करण्यात येत आहे, अशी भाजपवर टीका केली. ही टीका त्यांनी सतत अजित पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेतून केली.
अजित पवार यांच्यावर होणाऱ्या टीके संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पाटील, यांनी या गोष्टीवर प्रतिक्रीय देण्याची आवशकता नाही. राज्यात खंबीर पक्ष असल्यानेच अशी टीका होत असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.
Published on: Jan 07, 2023 10:56 AM