Video : ही थप्पड महागाईने होरपळणाऱ्या प्रत्येक महिलेला, वैशाली नागवडेंवरील हल्ल्यानंतर विद्या चव्हाणांचा संताप

| Updated on: May 17, 2022 | 4:03 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली नागवडे (Vaishali Nagawade) यांना पुण्यातील कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी (Pune BJP) श्रीमुखात भडकावल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अधिकच आक्रमक झाली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी लगावलेली ही थप्पड फक्त राष्ट्रवादीच्या (Pune NCP) कार्यकर्त्यावरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आया-बहिणीच्या तोंडावर दिली आहे. भाजपाला याचा हिशेब द्यावाच लागेल. भाजपाला माफी मागावी लागेल, असा पवित्रा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष […]

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली नागवडे (Vaishali Nagawade) यांना पुण्यातील कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी (Pune BJP) श्रीमुखात भडकावल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अधिकच आक्रमक झाली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी लगावलेली ही थप्पड फक्त राष्ट्रवादीच्या (Pune NCP) कार्यकर्त्यावरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आया-बहिणीच्या तोंडावर दिली आहे. भाजपाला याचा हिशेब द्यावाच लागेल. भाजपाला माफी मागावी लागेल, असा पवित्रा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी घेतला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्यातील एका कार्यक्रमात वैशाली नागवडे महागाईविरोधातील निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र यावेळी वैशाली यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Published on: May 17, 2022 04:03 PM
Video : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करणार-दिलीप वळसे पाटील
बेटी बचाओ बेटी पढाओ ! ही तुमची बेटी आहे ? – सुप्रिया सुळे