अजित पवार योग्यचं बोलले, पुण्यात कार्यकर्त्यांनी वक्तव्याचं केलं समर्थन
अजित पवार यांनी समर्थन देताना पुण्यातील कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक असे पोस्टर झळकावत गाड्यांवर स्टिकर्स ही लावले.
पुणेः छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करणाऱ्यात आली होती. त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने केली गेली. त्याचबरोबर राजीनामा देखिल मागितला गेला. त्यानंतर अजित पवार यांनी समोर येत आपली भूमिका मांडली आणि आपण चुकलो नसल्याचे सांगितलं. त्यानंतर आता पुण्यात त्यांच्या त्या वक्तव्याला पाठिंबा मिळत आहे
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या विधाने समर्थन केलं आहे. तसेच त्यांच्या समर्थन छत्रपती संभाजी महाराज यांचे पोस्टर्स झळकवले आहेत.
अजित पवार यांनी समर्थन देताना पुण्यातील कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक असे पोस्टर झळकावत गाड्यांवर स्टिकर्स ही लावले.
Published on: Jan 05, 2023 02:40 PM