राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा रोहित पवार यांच्यावर निशाणा, ‘सही केली होती की नाही ते स्पष्ट करा’
भाजपा पाठींबा देण्यासाठी राष्ट्रवादीच्या पत्रावर सही केली होती की नाही ते स्पष्ट करा. शिवसेना वेगळी झाल्यानंतरची ही घटना आहे. त्यानंतर अजितदादा वेगळे झाले. त्यामुळे आता रोहित पवार यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत.
SITE :
LINK :
SOCIAL : नेता होण्याची संधी म्हणून आता दुटप्पी भूमिका, राष्ट्रवादीच्या या नेत्याने साधला रोहित पवार यांच्यावर निशाणा
ENGLISH TITLE :
YOU TUBE LINK :
EXCERPT :
अकोला : 5 ऑक्टोबर 2023 | अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आमदार रोहित पवार यांना टोला लगावलाय. आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर भाजपसोबत गेलं पाहिजे यासाठी रोहित पवार गेले होते की नाही हे त्यांनी स्पष्ट करावं. ज्यावेळेस शिवसेना वेगळी झाली होती. त्यावेळेस भाजपला पाठिंबा देण्यासाठी 53 आमदारांच पत्र होतं. त्यावर रोहित पवार यांची सही होती की नाही हे त्यांनी सिद्ध करावं मगच धर्मनिरपेक्षतेच्या आणि विचारधारेच्या गप्पा माराव्या अशी टीका सुरज चव्हाण यांनी केलीय. एकीकडे मतदारसंघाचा विकास करण्यासाठी भाजपसोबत गेलं पाहिजे असं म्हणतात आणि दुसरीकडे दादा भाजपसोबत गेल्यावर नेता होण्याची संधी दिसायला लागली त्यावेळेस विचारधारा आठवली ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे असा टोला त्यांनी रोहित पवार यांना लगावला. अकोला येथे पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.