तुमच्याकडे येण्यापूर्वी ज्यांच्यावर आरोप होते ? त्यांच्यावरील कारवाईचे काय? रोहित पवार यांचा ईडी कारवाईवर भाजपाला सवाल

| Updated on: Jan 06, 2024 | 1:43 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या संस्थांवर ईडीने धाड घातली आहे. त्यामुळे परदेशात असलेले रोहित पवार भारतात परतले आहेत. त्यांनी भारतात आल्यानंतर मिडीयाशी बोलताना आपण ईडीला घाबरत नाही. त्यांना सर्व कागदपत्रं आणि पुरावे देणार आहे. परंतू भाजपाने केवळ विरोधातील लोकांनाच टार्गेट करणे थांबवावे. त्याच्याकडे येण्यापूर्वी ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले होते त्यांच्यावरील कारवाईचे काय ? असाही सवाल त्यांनी भाजपाला केला आहे. जे हातोडा घेऊन फिरत होते त्यांचे काय झाले ? असेही पवार यांनी विचारले आहे.

पुणे | 6 जानेवारी 2023 : शरद पवारांचे नातू रोहित पवार यांच्या बारामती एग्रो कंपन्यांसह इतर संस्थांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. रोहित पवार यांनी परदेशातून आल्यानंतर याविषयी मिडीयाशी संवाद साधला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांविषयी आपला काही आक्षेप नाही. ते त्यांना दिलेले आदेश पाळतात. आमच्यावर आधीही सीआयडी, ईओडब्ल्यू, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अशा विविध संस्थानी कारवाई केली आहे. सर्व कागदपत्र दिलेली आहे. मला केवळ विचारयचे आहे. केवळ विरोधकांवरच कारवाई का ? तुमच्याकडे येण्यापूर्वी ज्यांच्यावर आरोप केले होते त्यांच्यावरील कारवाईचे काय? मी आधी व्यवसायात होतो. नंतर राजकारणात आलो. परंतू जे आधी राजकारणात होते नंतर मोठे व्यवसाय करू लागले त्यांच्यावर कारवाईचे काय ? असा सवालही रोहित पवार यांनी केला आहे. आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या आरोपावर रोहित पवार यांनी त्यांना मंत्री पद न मिळाल्याने त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला आहे. त्यांचा मेंदू छोटा झाला आहे असा आरोप त्यांनी केला आहे. जर काही चुकीचे केले असते तर मी परदेशातून परत कसा आलो असाही सवाल पवार यांनी केला आहे. महाराष्ट्रातील कायदा- सुव्यवस्था सर्वात खराब आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्याकडे लक्ष पुरवावे अशीही मागणी केली.

Published on: Jan 06, 2024 01:42 PM
Video | शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे काम पूर्ण, कसा आहे देशातला सर्वात मोठा सागरी महामार्ग?
100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन उद्घाटनाला काका-पुतण्याने एकत्र येण टाळलं