वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावर कसले सावट? असं काय झालं की राष्ट्रवादीला स्थळ आणि वेळ बदलावं लागतयं?
या रौप्य महोत्सवी वर्षाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि.9 जून) रोजी अहमदनगर येथील केडगावमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यासंदर्भात मेळाव्याच्या मैदानाची पाहणी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. मात्र याचदरम्यान आता असं काय झालं की वेळ आणि ठिकाण बदलावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 24 वर्षे पूर्ण करून आता रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या रौप्य महोत्सवी वर्षाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि.9 जून) रोजी अहमदनगर येथील केडगावमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यासंदर्भात मेळाव्याच्या मैदानाची पाहणी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. मात्र याचदरम्यान आता असं काय झालं की वेळ आणि ठिकाण बदलावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. यासंदर्भात मात्र आता वेळ आणि स्थळ यांची माहिती मिळू शकलेली नाही. तसेच कारण ही कळू शकलेलं नाही. मात्र अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे हा कार्यक्रम आता पुढे ढकलण्याची शक्यता सुत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.
Published on: Jun 06, 2023 12:59 PM