Jayant Patil on MIM | MIM सोबत वेगवेगळ्या स्तरावर चर्चा सुरू आहेत
एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या पाठिंब्यासाठी कोणीही भेटलं नसल्याचे म्हटलं आहे
मुंबई : राज्यसभेच्या निवडणूकीवरून (Rajya Sabha elections) राज्यात घोडेबजार होण्याची शक्यता आहे. तर आता मतदानाला काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सराकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून आपले आमदार फुटणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. तर आपल्या पक्षाचा उमेदवार कसा निनडून येईल याची रणनिती आखली जात आहे. तसेच आपला उमेदवार हा निवडून यावा यासाठी अपक्षांसह छोट्या छोट्या पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या जात आहेत. अशातच एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी (MP Asaduddin Owaisi) यांनी आपल्या पाठिंब्यासाठी कोणीही भेटलं नसल्याचे म्हटलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी आपली प्रतिक्रीया देत MIM सोबत वेगवेगळ्या स्तरावर चर्चा सुरू असल्याचे म्हटलं आहे. तसेच याबाबत योग्यवेळ आल्यावर बोलू असेही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.