मुंबई आणि उपनगरात कालरात्रीपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आल्याने ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कार्यालयांना सुटी देण्यात आली आहे. सकाळपासून देखील ठाणे जिल्ह्यात जबरदस्त पाऊस कोसळत आहे. उल्हासनदीने साडे सतरा मीटर ही पुर रेषा ओलांडल्याने बदलापूरात एनडीआरएफची 35 जणांची टीम रवाना झाली आहे. उल्हासनगरातील पेट्रोल पंप देखील पाण्याखाली गेला आहे. कल्याण अशोक नगर परिसर जलमय झाला आहे. वालधुनी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या या अशोक नगरामधील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. घरामध्ये राहणारे रहिवासी घरे सोडून आपल्या नातेवाईकांकडे गेली आहेत.