… महत्त्व द्यायची गरज नाही तीच कॅसेट पुन्हा लावली आहे अजित पवारांची राज ठाकरेंवर टीका
साहेबांची 50- 60 वर्षांची राजकीय कारकीर्द तुमच्या समोर आहे. तरी एखाद खोटं बोलत असले तर त्याच्या बोलण्याला फार महत्त्व देण्याचं कारण नाही. लोकसभेच्या वेळी आपली सुपारी घेतली होती. आता तिकडची सुपारी घेतली असे म्हणत राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
नाशिक – कधीतरी 15 – दिवसांनी एखादी सभा दिवस मावळल्यावर उन्हाबिनाच नाही घ्यायची, उन्हाची नाही. असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे याची मिमिक्री करून दाखवत टीका केली आहे. आपण काही महत्त्व द्यायची गरज नाही तीच कॅसेट पुन्हा लावली आहे. म्हणजे काय तर पवार साहेबी जातीयवादी आहेत. तुम्हाला नाशिकरांना माहिती आहे, की पवार साहेब जातीयवादी आहेत का ते? राजू शेट्टी , रामदास आठवले यांनी सांगितले की साहेब जातीयवादी नाही. साहेबांची 50- 60 वर्षांची राजकीय कारकीर्द तुमच्या समोर आहे. तरी एखाद खोटं बोलत असले तर त्याच्या बोलण्याला फार महत्त्व देण्याचं कारण नाही. लोकसभेच्या वेळी आपली सुपारी घेतली होती. आता तिकडची सुपारी घेतली असे म्हणत राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.