Neelam Gorhe : काही लोक राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करतात, त्यावर काय बोलणार? नीलम गोऱ्हेंचा नितेश राणेंना टोला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नितेश राणे यांनी हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केला. त्यावरून नीलम गोऱ्हे यांनी अशा राजकारणासाठी हिंदुत्वाचा (Hindutva) वापर करणाऱ्यांवर काही बोलण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
मुंबई : काही लोक बोलतात. काही लोक राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करतात. त्यावर काय बोलणार, अशी टीका शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नितेश राणे यांनी हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केला. त्यावरून नीलम गोऱ्हे यांनी अशा राजकारणासाठी हिंदुत्वाचा (Hindutva) वापर करणाऱ्यांवर काही बोलण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. मधील काळामध्ये विशेषत: कोविडच्या काळामध्ये नगरविकास खाते कोणाकडे होते? स्मशानभूमी, बीएमसीतील विषय हे या मंत्र्याकडे असतात. त्यामुळे महाराष्ट्राविषयी असे गैरसमज पसरवणे म्हणजे त्यांचे राज्यावर पुतणा मावशीचे प्रेम असल्याची टीका त्यांनी भाजपावर (BJP) केली आहे. तर जनता शिवसेनेसोबत आहे, हे काल दिसून आले, असेही गोऱ्हे म्हणाल्या.
Published on: Sep 10, 2022 04:50 PM