‘ते’ सगळे आमदार उद्धव ठाकरेंसोबतच; नीलम गोऱ्हे यांचं महत्वाचं वक्तव्य

| Updated on: Feb 18, 2023 | 12:16 PM

पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंच्या हातातून निसटल्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...

मुंबई : पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंच्या हातातून निसटल्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरेगटाच्या नेत्या, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानपरिषदेतले आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. या आमदारांनी तसं नोटीफिकेशन दिलं आहे, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. फक्त विधीमंडळ म्हणून निर्णय घेता येणार नाही,असं कोर्टात गेल्यानंतर कोर्ट म्हणू शकतं. मनात दुःख आहे. जरूर आहे. हे सगळं राजकारणाचा भाग आहे. म्हणून याला सामोरं गेलं पाहिजे. आता खरी परीक्षा ही जनतेच्या कोर्टात होणार आहे. भारताच्या इतिहासात घडलं आहे की एखाद्याचं चिन्ह गोठवलं जातं आणि नंतर पुन्हा मिळवता येतं, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

Published on: Feb 18, 2023 12:16 PM
नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा थोड्याच वेळात शपथविधी; कोण उपस्थित राहणार? पाहा…
Video : ठाकरेगट पुन्हा एकदा ‘या’ कारणासाठी निवडणूक आयोगाकडे जाणार