राज ठाकरे यांचं भाषण अन् ते वक्तव्य; दिल्ली हायकोर्टाची मोठी टिप्पणी

| Updated on: Apr 28, 2023 | 12:59 PM

Delhi High Court on Raj Thckeray : राज ठाकरे यांना दिल्ली हायकोर्टाचा मोठा दिलासा

Follow us on

नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली हायकोर्टाकडून राज ठाकरेंना मोठा दिलासा देण्यात आला आहे. 2008 साली राज ठाकरे यांनी छटपूजे संदर्भात चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. एखाद्या व्यक्तीच्या भाषणांनं धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकत नाहीत, असं दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्याविरुद्धचं समन्स दिल्ली हायकोर्टाने रद्द ठरवलं आहे. धर्म आणि श्रद्धा ही माणसाइतकी नाजूक नसते, असं निरिक्षण दिल्ली हायकोर्टाने नोंदवलं आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाने धार्मिक भावनांचा भंग होऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.