Aditya Thackery | नवं सरकार गद्दारांचं, आदित्य ठाकरे यांची पुन्हा जहरी टीका

| Updated on: Jul 23, 2022 | 6:03 PM

Aditya Thackery Attacked | नवं सरकार गद्दार आणि स्वार्थी लोकांचं असल्याची घणाघाती टीका शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी केली.

Aditya Thackery Attacked | राज्यात भाजपसोबत(BJP) स्थापन झालेलं नव सरकार हे गद्दार आणि स्वार्थी लोकांचं असल्याची घणाघाती टीका शिवसेनेचे आदित्य ठाकरे (Aditya Thackery) यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा (Shiv swanad Yatra) औरंगाबाद येथे असताना त्यांनी जाहीर सभेत बंडखोरांचा (Rebel) समाचार घेतला. औरंगाबादचं संभाजीनगर करण्याचा निर्णय सर्वांनीच मान्य केला. कोविड काळातही महाराष्ट्र सरकारने उत्तम कामगिरी बजावली. हीच त्यांची पोटदुखी होती, असा फटकारी ही त्यांनी हाणला. कोरोना काळात (Covid) राज्यात साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आणण्यात राज्य सरकारला यश आलं. हे सगळं चांगलं चाललं होतं, तर मगं त्याला खोडा का घालण्यात आला असा सवाल त्यांनी केला. ही चांगलं सुरु असल्यानेच भाजपच्या पोटात दुखत असल्याचा टोला त्यांनी हाणला. तसेच बंडखोर निवडून येणार नसल्याचा दावा त्यांनी केला.

Anil Bonde on Fadnavis | ‘उप’ ही लवकरच निघून जाईल, फडणवीसच होणार मुख्यमंत्री? काय आहेत डॉ. बोंडे यांचे संकेत?
Amol Mitkari : देवेंद्र फडणवीस खुनशी प्रवृत्तीचे, ते कधीच मास लिडर होऊ शकत नाहीत; अमोल मिटकरींचा टोला