मध्य रेल्वेची सहावी वंदेभारत मुंबई सीएसएमटी ते जालना धावणार, पाहा वेळेची किती बचत होणार ?

| Updated on: Dec 30, 2023 | 2:26 PM

मध्य रेल्वेची सहावी वंदेभारत एक्सप्रेस सीएसएमटी, मुंबई ते जालना मार्गावर 1 जानेवारी 2024 पासून धावणार आहे. या ट्रेनचे औपचारिक उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. या अत्याधुनिक ट्रेनमुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. तसेच आरामदायी प्रवास घडणार आहे.

मुंबई | 30 डिसेंबर 2023 : मुंबई सीएसएमटी-जालना वंदेभारत एक्सप्रेस ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा शनिवारी झेंडा दाखविला जात आहे. मुंबई ते जालना रोडने 408 किमी अंतर असून प्रवासाला दहा तास लागतात. तर रेल्वे मार्गाने 434 किमीचे अंतर 7 तास 20 मिनिटात कापले जाणार आहे. जनशताब्दी हे अंतर 7 तास 45 मिनिटात कापले जाते. मध्य रेल्वेवरील सहावी वंदेभारत ट्रेन आहे. या ट्रेनची नियमित सेवा ट्रेन क्र. 20706 मुंबई-जालना सीएसएमटीहून दि.1 जानेवारी 2024 पासून दररोज ( बुधवार वगळून ) दु.1.10 वा.सुटेल आणि खालील वेळापत्रकरानूसार त्याच दिवशी रा. 8.30 वा. जालना येथे पोहचेल. स्थानक – आगमन/निर्गमन, सीएसएमटी मुंबई …./ दु.1.10 वा., दादर – दु.1.17 वा./ 1.19, ठाणे – 1.40 वा./1.41 वाजता, कल्याण जंक्शन – 2.04 वाजता / 2.06 वाजता, नाशिक रोड – दु. 4.28 वाजता/दु.4.30 वाजता, मनमाड जंक्शन – सायं. 5.30 वाजता / सायं. 5.32 वाजता, संभाजीनगर – रा.7.08 वाजता / रा.7.10 वाजता, जालना …/रा.8.30 वाजता.

जालना-सीएसएमटी ट्रेन क्र.20705 : जालना-सीएसएमटी, मुंबई वंदे भारत एक्सप्रेस दि. 2 जानेवारी 2024 पासून दररोज ( बुधवार वगळता ) जालनाहून स. 5.05 वा. सुटेल आणि खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार त्याच दिवशी स. 11.55 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.

स्थानके – आगमन/निर्गमन

जालना …/स. 5.05 वाजता, संभाजीनगर -स. 05.48 वाजता/05.50 वाजता, मनमाड जंक्शन -स. 7.40 वाजता/स. 7.42 वा., नाशिक रोड – 8.38 वाजता/8.40वाजता, कल्याण जंक्शन -10.55 वाजता/10.57 वाजता, ठाणे – 11.10 वाजता/11.12 वाजता, दादर – स. 11.32 वाजता / स. 11.34 वाजता, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,मुंबई स. 11.55 वाजता/… थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड आणि संभाजीनगर

डब्याची रचना: 1 वातानुकूलित एक्झिक्युटिव्ह क्लास आणि 7 वातानुकूलित चेअर कार

 

Published on: Dec 30, 2023 02:25 PM