Breaking | 12 वी परीक्षेसाठी CBSE चा नवा पॅटर्न?
आता तीन तासांच्या परीक्षेऐवजी फक्त 90 मिनिटांच्या कालावधीत परीक्षा घेतली जाईल. तसेच केवळ मुख्य विषयांसाठी लेखी परीक्षा होईल. (New pattern of CBSE for HSC exam)
नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील बहुतांश राज्यांमधील दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय माध्यम शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे (HSC exam) स्वरुप बदलण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता तीन तासांच्या परीक्षेऐवजी फक्त 90 मिनिटांच्या कालावधीत परीक्षा घेतली जाईल. तसेच केवळ मुख्य विषयांसाठी लेखी परीक्षा होईल. तर उर्वरित विषयांसाठी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले जाईल, अशी शक्यता आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.