कसबा निवडणुकीत उमेदवार नवा ट्विस्ट, काँग्रेसचा मोठा नाराज नेता प्रचारात उतरणार

| Updated on: Feb 19, 2023 | 6:46 PM

नाशिक विधान परिषद निवडणूकीत प्रचारापासून दूर असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आता पुण्यातील कसबा मतदारसंघाची धुरा संभाळणर आहेत.

पुणे : नाशिक विधान परिषद निवडणूकीत प्रचारापासून दूर असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आता पुण्यातील कसबा मतदारसंघाची धुरा संभाळणर आहेत. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वादाची ठिणगी पेटली होती. मात्र, दिल्लीवरून केंद्रीय निरीक्षकांनी त्यांच्यात सलोखा घडवून आणला. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात पक्षवाढीसाठी मेहनत घेत आहेत. कसबा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेवारी दिली आहे. धंगेकर यांचा प्रचार जोरात सुरु असून बाळासाहेब थोरात हे ही प्रचारात सामील होणार आहेत. आज पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत. पुण्यातील काँग्रेसभवन ऐवजी टर्बो हॉटेल येथे ही बैठक होणार आहे.

Published on: Feb 19, 2023 06:46 PM
काँग्रेसचे अनेक नेते भाजपात येण्यासाठी उत्सुक, या नेत्यानं केला गैप्यस्फोट अन् म्हणाले…
उद्धव ठाकरे यांच्यासाठी येणारा काळ अधिक बिकट, ‘या’ भाजप नेत्यानं केली भविष्यवाणी