शिरुरवरून राष्ट्रवादीच खलबतं? नव्या उमेदवाराची चाचपणी का सुरु? खासदार कोल्हे नाराज की?

| Updated on: Jun 01, 2023 | 10:17 AM

राज्यात अनेक नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्याचे चित्र आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुका एका वर्षावर येऊन ठेपल्या असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस समोर नवा पेच निर्माण झाला आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आता राष्ट्रवादीला शिरूर मतदारसंघात धक्का बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

पिंपरी : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. राज्यात अनेक नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्याचे चित्र आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुका एका वर्षावर येऊन ठेपल्या असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस समोर नवा पेच निर्माण झाला आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आता राष्ट्रवादीला शिरूर मतदारसंघात धक्का बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कारण येथे असाणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पक्षाने तेथे नव्या उमेदवाराची चाचपणी सुरु केली आहे. त्याचवेळी राज्याचे माजी गृहमंत्री आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागले आहेत. मात्र याचदरम्यान भोसरीचे प्रथम आमदार आणि पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलास लांडे यांनी शिरूरवर दावा ठोकला आहे. त्यांनी तेथून उमेदवारी मागितली आहे. शिरूरवरून मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे.

Published on: Jun 01, 2023 10:16 AM
“जनतेच्या भावनेचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आदर केला”, अहमदनगरच्या नामांतरावर कोणी केले कौतुक
“स्वाभिमान गुंडाळून नितेश राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश”, ठाकरे गटाचा हल्लाबोल