100 Super Fast News | शिवसेना काढून घेण्याची निवडणूक आयोगाची लायकी नाही : राऊत

| Updated on: Mar 18, 2023 | 9:09 AM

2014 विधानसभा निवडणुकीचा ए आणि बी प्लॅन तयार आहे. तेव्हा काय करायचं ते पाहू असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

सुपरफास्ट 100 न्यूज | 2014 विधानसभा निवडणुकीचा भाजप शिवसेनेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती. तर भाजपला 240 जागा तर 48 जागा शिवसेनेला देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता बावनकुळे यांनी घुमजाव करत अध्यापही जागा वाटपाचे सूत्र ठरेललं नसल्याचं सांगितलं आहे. तर सत्तासंघर्षावरील सुनावणी संपताच मंत्रालयात लगबग सुरू असून जुन्या फाईल पटापट काढल्या जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. 2014 विधानसभा निवडणुकीचा ए आणि बी प्लॅन तयार आहे. तेव्हा काय करायचं ते पाहू असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. तर शिवसेना काढून घेण्याची निवडणूक आयोगाची लायकी नाही असा हल्लाबोल राऊत यांनी करत 2024 मध्ये निवडणूक आयोगाला बघून घेऊ असा इशारा ही त्यांनी दिला आहे. याचबरोबर एकनाथ शिंदे सोडून इतर सर्व पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे येतील पण आम्ही त्यांना घेणार नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आहे.

आंदोलनात शेतकऱ्याचा मृत्यू, एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण
उद्धव ठाकरेंच्या टीकेला मिळणार उत्तर; शिंदेंच्या सभेसाठी मैदानात जय्यत तयारी