36 Jilhe 50 Batmya : नाशकात होणार नुकसानीचे पंचनामे; भरघोस मदतीची अपेक्षा

| Updated on: Mar 09, 2023 | 11:33 AM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प आज मांडणार. यावेळी अवकाळी पावसामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना भरघोस मदतीची अपेक्षा आहे

मुंबई : अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रंगनाथन डी यांनी दिलेले आहेत. दिलेले आदेशाप्रमाणे आज पासून पंचनामे सुरू होतील. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प आज मांडणार. यावेळी अवकाळी पावसामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना भरघोस मदतीची अपेक्षा आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या या अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडेही राज्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे. वाशिममध्ये वादळीवाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. त्याचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. याबरोबर पहा इतर गाव खेड्यातील बातम्या 36 जिल्हे 50 बातम्यांमध्ये

Published on: Mar 09, 2023 11:33 AM
अधिवेशनात एकच चर्चा; सोडूण गेलेल्या हातांनी उद्धव ठाकरे यांना नमस्कार
संजय राऊत यांना तात्काळ मानसोपचारतज्ज्ञाकडे नेण्याची गरज; कुणी डागलं टीकास्त्र?