Super Fast News : देवेंद्र फडणवीस यांची राजकीय धुळवड म्हणाले, आम्ही…

| Updated on: Mar 08, 2023 | 7:34 AM

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी आजपासून मनभेद-मतभेद विसरून महाराष्ट्रासाठी एकत्र काम करू असे आवाहन केलं आहे

Super Fast News : राज्यातील अनेक ठिकाणी होळी साजरी करण्यात आली आणि आज धुळवड केली जात आहे. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी राजकीय धुळवड करत शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखिल आपल्या विरोधकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी विरोधकांना माफ केलं हाच आमचा बदला असे म्हटलं. तर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी आजपासून मनभेद-मतभेद विसरून महाराष्ट्रासाठी एकत्र काम करू असे आवाहन केलं आहे. भगव्या रंगाची मक्तेदारी कोणाकडे नाही असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.

Published on: Mar 07, 2023 03:31 PM
पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक हरल्यानंतर अजित पवार यांच्या मनात ‘ही’ खंत; भरसभेत बोलून दाखवलं…
‘या’ गावची अनोखी प्रथा, धुलिवंदनला जावयाची गाढवावरून जंगी मिरवणूक, बघा व्हिडीओ