4 Minutes 24 Headlines : … तर नाराज आमदार सोडून जातील, अजित पवार यांचा इशारा

| Updated on: Mar 07, 2023 | 6:07 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मनात कटुता नाही. आम्ही विरोधकांना माफ केलं हाच आमचा बदला असे म्हणत कटुता संपविण्याचे संकेत दिले आहेत

4 Minutes 24 Headlines : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि भाजप शिवसेनेत कटूता आली. त्यानंतर ते आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना भाजपकडून उद्धव ठाकरे यांनी खंजीर खुपसून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत घरोबा केल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर आता फडणवीस-शिंदे यांचे सरकार आले असतानाही पुन्हा एकदा टीका टीपणी सुरूच आहे. मात्र या धुळवडीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मनात कटुता नाही. आम्ही विरोधकांना माफ केलं हाच आमचा बदला असे म्हणत कटुता संपविण्याचे संकेत दिले आहेत. तर अजित पवार यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीस यांना आवाहन दिलं आहे. जर मंत्री मंडळाचा विस्तार झाला तर नाराज आमदार सोडून जातील असंही पवार म्हणाले.

Published on: Mar 07, 2023 06:07 PM
शिवाईनगर शाखेवरून राऊत फडणवीस यांच्यात टीकेची धुळवड
तसं रंग उधळण्याचं काम वाढत जाणार, अशोक चव्हाण यांनी नेमक्या काय दिल्या होळीच्या शुभेच्छा?