Eknath Shinde : मंत्रिमंडळ विस्ताराचा पुढचा टप्पा सप्टेंबरमध्ये..! कुणाची वर्णी लागणार

| Updated on: Aug 09, 2022 | 7:50 PM

गोगावले यांचा आता दुसऱ्या टप्प्यात नंबर येईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. कुणाला संधी द्यावी हे पूर्णत: मुख्यमंत्री यांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे याबाबत अधिकचे सांगता येत नाही पण कोकणाला भरत गोगावले यांच्या रुपाने तिसरा मंत्री मिळेल असेही केसरकर म्हणाले आहेत. उर्वरित मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी दोन्ही पक्ष हे उत्सुक आहेत. त्यामुळे त्यामध्येही कोणती अडचण येणार नसल्याचे ते म्हणाले आहेत.

मुंबई : विरोधकांच्या टिकेनंतर अखेर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मंगळवारी हा विस्तार होताच पुढचा टप्पा हा सप्टेंबरमध्ये होणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. शिवाय दुसऱ्या टप्प्यात भरत गोगावले यांची वर्णी लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. कोकणातून उदय सामंत आणि दीपक केसरकर यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे गोगावले यांचा आता दुसऱ्या टप्प्यात नंबर येईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. कुणाला संधी द्यावी हे पूर्णत: मुख्यमंत्री यांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे याबाबत अधिकचे सांगता येत नाही पण कोकणाला भरत गोगावले यांच्या रुपाने तिसरा मंत्री मिळेल असेही केसरकर म्हणाले आहेत. उर्वरित मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी दोन्ही पक्ष हे उत्सुक आहेत. त्यामुळे त्यामध्येही कोणती अडचण येणार नसल्याचे ते म्हणाले आहेत.

Kolhapur : झाडावर अडकलेल्या वानराची दोरीच्या सहाय्याने सुटका, जवानांच्या प्रयत्नांना यश
…जर आम्हाला बोलवलं असतं तर आणखी आनंद झाला असता