लॉरेन्स बिश्नोई गँगविरोधात एनआयए ॲक्शन मोडमध्ये

| Updated on: Sep 12, 2022 | 10:22 AM

एनआयएने गुंडांच्या आणि त्यांच्या टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी संपूर्ण माहितीपत्र तयार केले असून 10 जणांवर गुन्हा दाखल केला गेला आहे.एनआयएने नीरज बवाना, लॉरेन्स बिश्नोई आणि टिल्लू ताजपुरिया यांच्यासह 10 गुंडांची यादी तयार केली होती. त्या टोळ्यां विरोधात वेगवेगळ्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून देशातील सुमारे 60 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. भारताती तुरुंगात आणि परदेशात कार्यरत असणाऱ्या गुंडाविरोधात ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी एनआयएकडून हरियाणा आणि पंजाब पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली असून पुढील कारवाईसाठी कडक धोरण अवलंबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एनआयएने गुंडांच्या आणि त्यांच्या टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी संपूर्ण माहितीपत्र तयार केले असून 10 जणांवर गुन्हा दाखल केला गेला आहे.एनआयएने नीरज बवाना, लॉरेन्स बिश्नोई आणि टिल्लू ताजपुरिया यांच्यासह 10 गुंडांची यादी तयार केली होती. त्या टोळ्यां विरोधात वेगवेगळ्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले आहेत.

Published on: Sep 12, 2022 10:22 AM
पावसामुळे पुण्यातील खेड परिसराला पुराचा फटका
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन माणसांची जुळवाजुळव? ऑडिओ क्लिप व्हायरल