Dawood Ibrahim च्या 20हून अधिक मालमत्तांवर NIA चा छापा

| Updated on: May 09, 2022 | 11:15 AM

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोठी कारवाई केली आहे. एनआयएने (NIA) आज मुंबईतील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत.

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोठी कारवाई केली आहे. एनआयएने (NIA) आज मुंबईतील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. हे 20 अड्डे दाऊदच्या शार्प शूटर, तस्करांशी संबंधित आहेत. याशिवाय अनेक हवाला ऑपरेटर्सवरही छापे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे दाऊद इब्राहिमसाठी हा मोठा दणका (Mumbai Crime News) मानला जातो. नागपाडा, भेंडी बाजार, मुंब्रा, भिवंडी, गोरेगाव, बोरीवली, सांताक्रुझ यासारख्या वीसहून अधिक ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत. एनआयएच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे सापडल्याची माहिती आहे.

Published on: May 09, 2022 11:15 AM
ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 9 May 2022