स्वातंत्र्यदिनापूर्वी एनआयएची मोठी कारवाई; कोल्हापुरात तीन ठिकाणी छापेमारी, तीन जणांना घेतलं ताब्यात
तर पुण्यात मोठी कारवाई करत एनआयएने दहशतवादी असल्याच्या संशयावरून दोघांना अटक केली होती. तर त्यांचा संबंध पीएफआयशी अशल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला होता. त्यानंतर आता स्वातंत्र्यदिनापूर्वी एनआयएने मोठी कारवाई केली आहे.
कोल्हापूर, 14 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसापासून राज्याचे दहशतवाद विरोधी पथक हे अलर्टमोडवर आले आहे. तर पुण्यात मोठी कारवाई करत एनआयएने दहशतवादी असल्याच्या संशयावरून दोघांना अटक केली होती. तर त्यांचा संबंध पीएफआयशी अशल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला होता. त्यानंतर आता स्वातंत्र्यदिनापूर्वी एनआयएने मोठी कारवाई केली आहे. तर एनआयएने 5 राज्यात 14 ठिकाणी छापेमारी केली आहे. तर यावेळी राज्यातील कोल्हापूर आणि नाशिकमध्ये ही छापेमारी करताना कोल्हापूरमधून तीनजणांना ताब्यात घेतले आहे. कोल्हापुरातील कोल्हापूर, इचलकरंजी आणि हुपरीत एनआयएने ही कारवाई केली आहे. तर एनआयएने ताब्यात घेतलेल्या तिघांचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय एनआयएला आहे.
Published on: Aug 14, 2023 10:27 AM