“शरद पवारांनी धर्मांतर करावं”, ‘त्या’ वादग्रस्त ट्विटनंतर निलेश राणे यांची टीका

| Updated on: Jun 08, 2023 | 2:49 PM

"या देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन या दोन समाजांच्याबाबत चिंता वाटावी असं चित्र आहे", असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. यानंतर भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. निलेश राणे यांनी शरद पवार यांची तुलना थेट औरंगजेबशी केली आहे. दरम्यान निलेश राणे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत शरद पवार यांनी धर्मांतर करावा असं म्हटलं आहे.

मुंबई : “या देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन या दोन समाजांच्याबाबत चिंता वाटावी असं चित्र आहे”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. यानंतर भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. निलेश राणे यांनी शरद पवार यांची तुलना थेट औरंगजेबशी केली आहे. दरम्यान निलेश राणे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत शरद पवार यांनी धर्मांतर करावा असं म्हटलं आहे. “मुस्लिम धर्माला वाढवण्यासाठी जे शक्य होतं ते सगळे करायचं, पवार साहेबांनी जेवढी मुस्लिमांची बाजू घेतात, तेवढी हिंदू समाजाची कधी बाजू घेत नाही. म्हणून मला असं वाटलं की औरंगजेब परत जन्मला आला”, असं निलेश राणे म्हणाले.

Published on: Jun 08, 2023 02:49 PM
“संजय राऊत भांडूपचे देवानंद”, नितेश राणे यांचा हल्लाबोल
कोल्हापुरातील राड्यामुळे अंबाबाई मंदिरात भाविकांची संख्या घटली, व्यापाऱ्यांचं म्हणणं काय?