“मॅडम माझं कुटुंब वर्षानुवर्षे भाजपचं काम करतं, फक्त एवढं काम करा”, कार्यकर्त्याच्या विनंतीवर सीतारमण भडकल्या
भाजप कार्यकर्त्याच्या विनंतीवर सीतारमण भडकल्या, म्हणाल्या...
अभिजीत पोते, पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी सासवडमध्ये बुथ अध्यक्षांची बैठक घेतली. त्या बैठकीतून त्या बाहेर आल्या. मात्र एका भाजप (BJP) कार्यकर्त्याच्या घरी ही बैठक झाली. त्यांच्या कुटुंबाला अर्थमंत्र्यांसोबत एक फोटो काढायचा होता. सितारामण बाहेर आल्यानंतर भाजप कार्यकर्ताही बाहेर आला. त्याने विनंती केली की, मॅडम आमचं पूर्ण कुटुंब सकाळपासून तुम्हाला भेटण्यासाठी थांबलंय. माझ्या वडिलांपासून आमचं कुटुंब भाजपचं काम करतं. त्यांना तुम्हाला भेटायचंय आणि त्यांना तुमच्यासोबत फोटो काढायचाय. भाजप कार्यकर्त्याच्या या मागणीवर निर्मला सीतारामन भडकल्याचं पाहायला मिळालं.
Published on: Sep 22, 2022 11:26 PM