“शाहरुखच्या मुलाची काळजी , मग मंचरमधील पीडितेला कधी भेटणार ?, नितेश राणे यांचा सुप्रिया सुळेंना सवाल
पुण्यातील घोरपडी गाव येथे घडलेल्या लव्ह जिहादबाबत आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौक ते जय हिंद चौक घोरपडी दरम्यान हा निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत लव जिहाद प्रकरणावर भुमिका मांडली.
पुणे : पुण्यातील घोरपडी गाव येथे घडलेल्या लव्ह जिहादबाबत आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौक ते जय हिंद चौक घोरपडी दरम्यान हा निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत लव जिहाद प्रकरणावर भुमिका मांडली.नितेश राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सवाल केला आहे. महाराष्ट्राच्या काही ताई बोलतात की लव्ह जिहाद होत नाही.पण ताई तुम्ही मंचरच्या बहिणीला भेटायला गेलं पाहिजे.तुम्हाला त्या शाहरुख खानच्या मुलाची चिंता आहे. पण मंचरच्या पीडितेला कधी भेटणार? असा सवाल नितेश राणे यांनी केला.
Published on: Jun 04, 2023 02:10 PM