“उद्धव ठाकर यांच्यासोबत फक्त आदित्य ठाकरे, राऊत, अंधारे एवढेच राहतील”, भाजप नेत्याची टीका
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.माझी भूमिका विकासाची आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकास होत आहे. त्यामुळेच मी त्यांच्यसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “शिवसेना आणि राष्ट्रवादीने संजय राऊत यांचा सत्कार केलं पाहिजे. त्यांनी आमचं काम सोपं केलं आहे. बाकीचे आमदारही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील. उबाठामध्ये फक्त उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारेच राहणार आहेत.”
Published on: Jul 07, 2023 04:14 PM