नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नार्वेकर हे आमचे जुने मित्र आहेत, असं आज नितेश राणे यांनी म्हंटल आहे. विधान भवनात बोलताना त्यांनी हा उल्लेख केला.
मिलिंद नार्वेकर हे आमचे जुने मित्र आहेत, असं आज नितेश राणे यांनी म्हंटल आहे. विधान भवनात बोलताना त्यांनी हा उल्लेख केला. नीलकमल बोट दुर्घटने बाबत नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. नार्वेकर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत.
यावेळी बोलताना राणे म्हणाले की, आमचे जुने मित्र मिलिंद नार्वेकर यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास आहे. पण याबद्दल बंधारे खातं म्हणून काय कारवाई करणार म्हणून त्यांनी प्रश्न विचारला आहे, असं नितेश राणे म्हणाले. यावेळी राणेंनी मिलिंद नार्वेकर यांना जुने मित्र म्हणताच सभागृहात सर्वांनी मिश्किल हास्य केलेलं बघायला मिळालं.
Published on: Mar 17, 2025 07:07 PM