“संजय राऊत भांडूपचे देवानंद”, नितेश राणे यांचा हल्लाबोल
भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा भांडूपचा देवानंद असा उल्लेख केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मी संभाजीनगर म्हणणार नाही, औरंगाबाद बोलणार असं वक्तव्य केलं आहे.
सिंधुदुर्ग : भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा भांडूपचा देवानंद असा उल्लेख केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मी संभाजीनगर म्हणणार नाही, औरंगाबाद बोलणार असं वक्तव्य केलं आहे. तर बाळासाहेब ठाकरेंची मागणी होती औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करा, हे शरद पवारांना सांगण्याची हिंमत आहे का संजय राऊत यांच्यामध्ये?, असं नितेश राणे म्हणालेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरही नितेश राणेंनी घणाघात केलाय. “मुंब्र्याच्या आमदारांनी महाराष्ट्रात दंगली होतील असं विधान केलं होतं. दोन तीन महिन्या अगोदर जितेंद्र आव्हाडांना कसं कळलं होतं की राज्यात दंगली होणार आहेत? कोल्हापूरच्या नेत्याला कसं कळलं की दंगल होणार आहे? आव्हाडांच्या मतदरसंघात 400 लोकांना धर्मांतर करताना पकडलं, यावर संजय राऊतांनी सामनात अग्रलेख लिहावा”, असं नितेश राणे यांनी म्हटलंय. “अमोल मिटकरी यांना कोणीही बाजारात विकत घेऊ शकतो”, अशी टीका नितेश राणे यांच्यावर केली आहे.