“तू मर्दांनगीवर कलंक, तू किती मोठा मर्द आहेस, ते…”, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली

| Updated on: Jul 11, 2023 | 1:18 PM

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर होते. उद्धव ठाकरे यांची काल नागपुरात सभा झाली. या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर होते. उद्धव ठाकरे यांची काल नागपुरात सभा झाली. या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या याच टीकेला आता भाजप नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “बाळासाहेबांना प्राण्यांची उपमा देऊन हाक मारायचे. हे मी रामेश्वरची शपथ घेऊन सांगतो. देवेंद्र फडणवीस यांनी रक्ताच्या भावापेक्षा तुला जास्त संभाळलं. तुझे लाड केले. आज मातोश्री 2 मध्ये राहतोस. सामान्य शिवसैनिक, नातेवाईकांना तिथे जाण्याची परवानगी नाही. या मातोश्री 2 ला परवानग्या कोणी दिल्या? महापौरांचा जो बंगला, बाळासाहेबांच्या नावाखाली बळकावला, त्याची परवानगी कोणी दिली? 2014 ते 2019 मध्ये तुझे लाड फडणवीसांनी पुरवले, तुला संभाळलं. तुझ्या रक्ताचा भाऊ काय बोलतो, त्याची काय अवस्था केली? कधी आमचं तोंड उघडायला लावलस, तर महाराष्ट्राची जनता तुला चपलेने मारेल. बाळासाहेबांची औषध वेळेवर दिली नाहीस. खायला दिलं नाहीस. तू मर्दांनगीवर कलंक आहेस. तू किती मोठा मर्द आहेस, हे तुझ्या घरातल्यांना विचार, ते तुला सांगतील.”

Published on: Jul 11, 2023 01:18 PM
पंतप्रधान मोदी यांनी पुरस्कार स्वीकारण्याच्या आधी ‘हे’ करावं; राऊत यांचा खोचक सल्ला
‘बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कोणी अधिकार गाजवू शकत नाही’; शिंदे गटाच्या मंत्र्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार