‘सरड्यालाही लाज वाटेल अशी ही व्यक्ती’; उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेता भडकला
त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल करताना, भाजप म्हणजे आता भ्रष्टपार्टी झाली आहे अशी टीका केली आहे. तर ज्यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला त्यांच्याच बरोबर सत्तेत बसले आहेत. अजित पवार यांच्यावरून हा हल्लाबोल केला होता.
मुंबई, 30 जुलै, 2023 | माजी मुख्यमंत्री ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार टीका केली. त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल करताना, भाजप म्हणजे आता भ्रष्टपार्टी झाली आहे अशी टीका केली आहे. तर ज्यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला त्यांच्याच बरोबर सत्तेत बसले आहेत. अजित पवार यांच्यावरून हा हल्लाबोल केला होता. त्यावरून आता भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी सडकून टीका केली आहे. त्यांनी जर तुम्हाला अजित पवार हे भ्रष्टाचारी आहेत. ७० हजार कोटींचा ज्याच्यावर आरोप आहे त्यांच्याबरोबर सत्ता का स्थापन केली. त्यांच्याबरोबर फोटो का काढले. तर त्यांना का लोटांगन घालायला गेला होता असा सवाल केला आहे. तर सरड्याला ही लाज वाटेल असा रंग बदलणारा व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे असल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे.