“27 जुलै उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस, तो दिवस ‘देशद्रोही दिन’ घोषित करा,” भाजपची संयुक्त राष्ट्राकडे मागणी
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 20 जून जागतिक गद्दार दिवस साजरा करण्याची मागणी संयुक्त राष्ट्र संघाकडे केली. त्यासंदर्भात पत्र त्यांनी युनोला लिहिले आहे. त्याचवेळी भाजप आमदार नितेश राणे यांनीही संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहिले आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 20 जून जागतिक गद्दार दिवस साजरा करण्याची मागणी संयुक्त राष्ट्र संघाकडे केली. त्यासंदर्भात पत्र त्यांनी युनोला लिहिले आहे. त्याचवेळी भाजप आमदार नितेश राणे यांनीही संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहिले आहे. 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. मात्र, तो दिवस देशद्रोही दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी नितेश राणे यांनी युनोकडे केली आहे. ते म्हणाले की, “आजच मी युनायटेड नेशनला पत्र दिल आहे. 27 जुलै हा देशद्रोही दिवस जाहीर करावा, अशी विनंती केली आहे. 27 जुलै हा उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. उद्धव ठाकरे खरे देशद्रोही आहेत. त्यांनी स्वतःच्या वडिलांसोबत गद्दारी केली आहे. मराठी माणूस, हिंदू धर्माशी त्यांनी बेईमानी केली. ज्या भाजपने उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांना सांभाळलं. हिंदुत्वाच्या मुद्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली युती उद्धव ठाकरे यांनी तोडली. मुख्यमंत्रीपदाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षीमुळे त्यांनी ही युती तोडली. त्यांनी देश, मराठी माणूस यांच्यासोबत द्रोह केला, असे म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे याना बाळासाहेब कधी कळले होते का? असा सवाल त्यांनी केला.”