संजय राऊत यांच्या ‘त्या’ रिअॅक्शनवर नितेश राणे भडकले; म्हणाले, राऊतांची जीभ…”
"संजय राऊतांची जीभ फार वळवळते आहे, काल ते एका मराठी पत्रकारावर थुंकलेत. संजय शिरसाट यांचं नाव दलित समाजातून येतं. त्यांच्यावर देखील ते थुंकलेत.
सिंधुदुर्ग: “संजय राऊतांची जीभ फार वळवळते आहे, काल ते एका मराठी पत्रकारावर थुंकलेत. संजय शिरसाट यांचं नाव दलित समाजातून येतं. त्यांच्यावर देखील ते थुंकलेत. राऊतांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा. सरकारला विनंती आहे, संजय राऊत यांना दिलेलं संरक्षण काढा. खरं म्हणजे संजय राऊत कोणावर थुंकले असतील, तर ते उद्धव ठाकरेंवर थुंकले आहेत. ज्याच्या पगारावर त्यांचं घर चालतं ते शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले. संजय राऊत आणि त्यांच्या मालकाची काय किंमत आहे, ते पवार साहेबांनी त्ंयांच्या मालकाला दाखवून दिली”, असं नितेश राणे म्हणाले. “तसेच लंडनमध्ये बसलेल्या तुमच्या मालकाला सांगा इथं यायची गरज नाही, तिकडेच एखाद्या हॉलचं नाव मातोश्री द्या”, असं देखील नितेश राणे म्हणाले.
Published on: Jun 02, 2023 03:19 PM