“महायुतीतला आगलाव्या संजय राऊत कोण? हे शोधलं पाहिजे”, नितेश राणे यांचं टीकास्त्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती करण्यात आल्याची जाहिरात मंगळवारी प्रत्येक वृत्तपत्रात पाहायला मिळाली. एका सर्वेक्षणाचा आधार देत एकनाथ शिंदे यांचा जाहिरातीत उत्कृष्ट मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. या जाहिरातीत ‘राष्ट्रामध्ये मोदी, तर महाराष्ट्रात’ शिंदे असंही म्हटलं आहे.
सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती करण्यात आल्याची जाहिरात मंगळवारी प्रत्येक वृत्तपत्रात पाहायला मिळाली. एका सर्वेक्षणाचा आधार देत एकनाथ शिंदे यांचा जाहिरातीत उत्कृष्ट मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. या जाहिरातीत ‘राष्ट्रामध्ये मोदी, तर महाराष्ट्रात’ शिंदे असंही म्हटलं आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना शिंदेंपेक्षा कमी टक्केवारीची पसंती असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या जाहिरातीवर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी पसरल्याचं वृत्त समोर आलं आहे. यावर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे म्हणाले की, “मी शिवसेनेच्या मित्रांना आवर्जून सांगतो की, भाजप-शिवसेनेच्या महायुतीतला आगलाव्या संजय राऊत कोण? हे शोधलं पाहिजे. काड्या लावणारा शकुनीमामा आपल्या महायुतीत कोण आहे? याचा शोध घेतला पाहिजे”.