उद्धव ठाकरे-केजरीवाल भेटीवरून नितेश राणेंची टीका, ‘काल राजकारणातली राखी सावंत…!’
"अन्य लोकांना बाप चोरला म्हणतात, चाटूगिरी करायची म्हणतात, पण खरी चाटूगिरी कोण करतंय तर संजय राजाराम राऊत. हल्ली काँग्रेसच्या चाटू गिरीच काम करत आहे. काँग्रेसची भूमिका कशी योग्य आहे आणि एका आदिवासी महिलेचा कसा अवमान केला हे संजय राऊत सांगत आहे.
सिंधुदुर्ग : “अन्य लोकांना बाप चोरला म्हणतात, चाटूगिरी करायची म्हणतात, पण खरी चाटूगिरी कोण करतंय तर संजय राजाराम राऊत. हल्ली काँग्रेसच्या चाटू गिरीच काम करत आहे. काँग्रेसची भूमिका कशी योग्य आहे आणि एका आदिवासी महिलेचा कसा अवमान केला हे संजय राऊत सांगत आहे. राहुल गांधी यांना आता राष्ट्रपती मुर्मु यांचा पुळका येतो. मग जेव्हा त्यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी आले तेव्हा काँग्रेसने उमेदवार का दिला?”, असे नितेश राणे म्हणाले.”काल राजकारणातील राखी सावंत आणि उर्फी जावेद एकत्र वडापाव खात होते. मातोश्रीवर नाती जपली जात आहेत, असं बोलणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर जयदेव ठाकरे, राज ठाकरे हसले असतील.राज ठाकरेंना तुम्ही किती अपमानीत केले होते.तुम्ही नाती जपली ती पाटणकर आणि सरदेसाईसोबत जपली”, असा टोला नितेश राणे लगावला.
Published on: May 25, 2023 03:33 PM