“स्वत:चा पक्षही नसलेले लोक विरोधकांच्या बैठकीत”, नितेश राणे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी देशातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काल बंगळुरुमध्ये विरोधकांची बैठक पार पडली. देशातील आगामी राजकारणाच्या दृष्टीने ही बैठक खूप महत्वाची आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे.
मुंबई, 19 जुलै 2023 | भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी देशातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काल बंगळुरुमध्ये विरोधकांची बैठक पार पडली. सोनिया गांधी नेतृत्वाखाली 26 विरोधी पक्ष यावेळी एकत्र जमले. देशातील आगामी राजकारणाच्या दृष्टीने ही बैठक खूप महत्वाची आहे. या बैठकीत भाजप विरोधात लढणाऱ्या या नव्या आघाडीचं नाव ठरवण्यात आलं. या आघाडीला ‘इंडिया’ असं नाव देण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे. नितेश राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते नेमकं काय म्हणाले यासाठी हा व्हिडीओ पाहा…
Published on: Jul 19, 2023 02:19 PM