“संसदेत भाषण करताना संजय राऊत यांनी 90…”, नितेश राणे यांचा हल्लाबोल
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना फोन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. असं असताना नितेश राणे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
सिंधुदुर्ग, 8 ऑगस्ट 2023 | दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना फोन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या खासगीतील विधानानंतर राजकारणातून अनेक तर्क वितर्क काढले जात आहे. असं असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. ते म्हणाले की, “राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे किती वेळा अपमान करणार हे सांगावं.उद्धव ठाकरेंच्या वृत्ती मुळेच साप मातोश्रीत आला. आपल्या पेक्षा कोण तरी विषारी आहे. हे समजल्यावर आला.” तसेच संजय राऊत यांनी आज राज्यसभेत तुफान भाषण केलं, याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी टीका केली आहे.
Published on: Aug 08, 2023 02:29 PM