उद्धव-राज ठकरे युती होणार का? नितेश राणे म्हणतात, “रश्मी ठाकरे यांना मान्य आहे का?”

| Updated on: Jul 07, 2023 | 10:27 AM

गुरुवारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मनसे नेते अभिजीत पानसे यांच्या भेटीमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: अजित पवार यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. गुरुवारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मनसे नेते अभिजीत पानसे यांच्या भेटीमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे म्हणाले की, “मातोश्रीच्या वहिणींना दोन भाऊ एकत्र येण मान्य आहे का? सगळ्या गोष्टींचा रिमोट कंट्रोल मातोश्रीच्या वहिणींच्या हातात आहे. त्यामुळे एकत्र येण्याचा प्रस्ताव मनसेनं सामना कार्यालयाच्या ऐवजी मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर मांडायला हवा होता.”

Published on: Jul 07, 2023 10:27 AM
बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता भडकला; अमोल मिटकरी यांना म्हणाला, “तुम्ही मम म्हणणार का?”
पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार? नाना पटोले यांच्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण