Nitesh Rane | नितेश राणे यांचं जितेंद्र आव्हाड यांना पत्र, पत्रात म्हटलं, मुंब्रारक्षक
नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांना पत्र लिहीत त्यांचा वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच त्यांचा उल्लेख मुंब्रारक्षक असा केला. त्याचबरोबर तुमची सर्वस्व श्रद्धा औरंगजेबावर असल्याचे सिद्ध झाल्याचेही राणे यांनी म्हटलं आहे.
मुंबई : राज्यातील सुरू झालेले वाद काही मिटताना दिसत नाहीत. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. यानंतर त्यांनी आपलं विधान माध्यमांनी तोडून-मोडून दाखवल्याचं म्हटलं होतं. यानंतर आता त्यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी तोफ डागली आहे. तसेच आव्हाडांचा उल्लेख हा मुंब्रारक्षक असा केला आहे.
आव्हाड यांनी आधी औरंगजेब कृत आणि हिंदू द्वेष्टा नव्हता असं म्हंटलं होत. त्यानंतर त्यांनी आपले वक्तव्य बदलत मी असे बोललो नाही. असे म्हटलं. तर औरंगजेब हा क्रूर होता. त्याने आईला मारलं, बापाला मारलं असं म्हणत आव्हाड यांनी सारवासारव केली आहे.
यानंतर आता नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांना पत्र लिहीत त्यांचा उल्लेख मुंब्रारक्षक असा केला. त्याचबरोबर तुमची सर्वस्व श्रद्धा औरंगजेबावर असल्याचे सिद्ध झाल्याचेही राणे यांनी म्हटलं आहे.