Nitesh Rane on Uddhav Thackeray | मुख्यमंत्री औषधही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विचारुन घेतात

| Updated on: Jun 07, 2022 | 6:48 PM

सध्या सोशल मिडियामध्ये शिवलिंगाची विटंबना करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यावरून आता नाशिक येथे भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.

नाशिक : सध्या ज्ञानवापी मशीदीत सापडलेल्या शिवलिंगवरून देशात वादंग माजलं आहे. तर यावरून राजकारण केले जात आहे. अशातच सध्या सोशल मिडियामध्ये शिवलिंगाची विटंबना करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यावरून आता नाशिक येथे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि प्रामुख्याने शिवसेनेवर तोफ डागली. तसेच त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्ववार टीका केली. तसेच पोलिसांनी आता समोर यावं असे ते म्हणाले. तसेच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)टीका करताना, मुख्यमंत्री औषधही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला (Congress, NCP) विचारुन घेतात का असा प्रश्न केला आहे.

Published on: Jun 07, 2022 06:48 PM
Nitesh Rane on Aaditya Thackeray | अयोध्येत वयाची मर्यादा आहे ना? राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
Jayant Patil on MIM | MIM सोबत वेगवेगळ्या स्तरावर चर्चा सुरू आहेत