…म्हणून मी उपोषण करणार; आमदार नितीन देशमुख यांचा इशारा

| Updated on: Mar 13, 2023 | 3:42 PM

Nitin Dekhmukh :आमदार नितीन देशमुख हे उद्या उपोषण करणार आहेत. त्यांनी स्वत:या बाबतची माहिती दिली आहे. ते काय म्हणालेत? पाहा...

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे उद्या उपोषण करणार आहेत. त्यांनी स्वत:या बाबतची माहिती दिली आहे. “ACB च्या संदर्भात मी घाबरत नाही. उद्या 11 वाजता विधानभवनात मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसणार आहे. माझ्या अकोला-बाळापूर मतदार संघातील 69 गावातील लोकांसाठी पाण्यासाठी आरक्षण देण्यात आलं होतं. ते या सरकारने आता मागे घेतलं आहे. त्यामुळे माझ्या मतदार संघावर अन्याय करण्याचं काम हे सरकार करत आहे. लहान लेकरालाही खारं पाणी प्यावं लागत आहेत. हे ठरवून घडवून आणण्यात आलं आहे”, असं नितीन देशमुख म्हणाले आहेत.

Published on: Mar 13, 2023 03:42 PM
भाजपनं आमदार राहुल कुल यांना निलंबित करावं; कुणी केली मागणी? पाहा…
शीतल म्हात्रे यांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओ प्रकरणी ठाकरे गटाला मोठा झटका