“किरीट सोमय्या स्वत:च्या कुटुंबाच्या नजरेतून उतरले”, ठाकरे गटाची टीका

| Updated on: Jul 19, 2023 | 9:16 AM

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई, 19 जुलै 2023 | भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “किरीट सोमय्या यांची परिस्थिती खराब झाली आहे. एक नालायक, पिसाळलेला माणूस आहे. सध्या किरीट सोमय्या यांची घरची परिस्थिती वेगळी आहे. किरीट सोमय्या माझे वडील आहेत, असं सांगायची हिंमतही त्यांच्या मुलांमध्ये नाही. ते मुलाच्या आणि कुटुंबाच्या नजरेतून उतरले आहेत. पक्षाची इज्जत जावू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्यांकडू हे पत्र लिहून घेतलं आहे.”

Published on: Jul 19, 2023 09:16 AM
कुपंनच शेत खातं; रूग्णांनी जायचं कुठं? कमिशनसाठी रूग्णांची फसवणूक? 11 जणांना अटक
आगामी लोकसभेला राज्यात युतीला किती मिळणार जागा? मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, ‘जनता कामाची पावती देईल’