राहुल गांधी यांनी मोठ्या मनाने ओबीसी समाजाची माफी मागावी; काँग्रेसच्याच नेत्याची मागणी

| Updated on: Mar 25, 2023 | 9:37 AM

ahul Gandhi : ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या, राहुलजी माफी मागा, अशी मागणी काँग्रेसच्या ओबीसी नेत्याने केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची लोकसभा सदस्यता रद्द करण्यात आली. त्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे. अशातच काँग्रेसचे नेते आशिष देशभुख यांनीही राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. “ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. माझ्या पाठिशी मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. मतदानाच्या रूपाने ते आपले आशिर्वाद देत असतात. राहुल गांधी यांनी मोठ्या मनाने ओबीसी समाजाची माफी मागावी”, असं आशिष देशमुख म्हणाले आहेत.

Published on: Mar 25, 2023 09:25 AM
मालेगावात ठाकरेंची तोफ धडाडणार; सभेची जय्यत तयारी सुरु आणि उत्सुकताही
राहुल गांधी यांना लोकांचा मिळणारा पाठिंबा पाहून कारवाई केली; सोलापुरात काँग्रेस आक्रमक