‘मी ठरवलंय, आता…’, नितीन गडकरी यांची नागपुरमध्ये मोठी घोषणा

| Updated on: May 28, 2023 | 7:25 AM

मी दिल्लीत हायड्रोजन कार वापरतो. मी नागपुरात इलेक्ट्रिक कार वापरतो. पण पोलीस आणि सुरक्षा रक्षक मला बुलेटप्रुफ कारशिवाय इतर कोणत्याही कारमध्ये बसू देत नाहीत. त्यामुळेच मला या गाडीत बसावे लागले आहे.

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देशातील रस्ते विकास आणि विस्तारीकरणाला गती देण्यात गुंतलेले आहेत. त्यांनी अल्पावधितच अनेक रस्ते बांधले. यासोबतच, ते देशातील इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या प्रचारासाठी आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मनापासून काम करत आहेत. नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील नागपुरमध्ये मोठी घोषणा केली आहे. नितीन गडकरी म्हणाले की, आता पेट्रोल-डिझेलच्या गाडीत बसणार नाही. त्यांनी ही घोषणा एका कार्यक्रमात केली. यावेळी ते म्हणाले की, ‘ते पेट्रोल-डिझेलच्या गाडीत बसणार नाहीत. ‘मी दिल्लीत हायड्रोजन कार वापरतो. मी नागपुरात इलेक्ट्रिक कार वापरतो. पण पोलीस आणि सुरक्षा रक्षक मला बुलेटप्रुफ कारशिवाय इतर कोणत्याही कारमध्ये बसू देत नाहीत. त्यामुळेच मला या गाडीत बसावे लागले आहे, पण आता पेट्रोल, डिझेल असलेल्या गाडीत बसणार नाही, असा निर्णय घेतला आहे. प्रत्येकाने इलेक्ट्रॉनिक स्कूटर खरेदी करावी, असे आवाहन गडकरींनी जनतेला केले. ते खूप फायदेशीर आहे. हळूहळू देशातून पेट्रोल आणि डिझेलची वाहने संपुष्टात येतील असेही ते म्हणाले.

Published on: May 28, 2023 07:25 AM
VIDEO | ड्रेसकोडवरून राजकाण्यांची उडी; राष्ट्रवादी नेता म्हणाला, ”जे नियम भक्तांसाठी तेच पूजाऱ्यांसाठीही”
शिवसेनेचे आजी, माजी आमदार पती-पत्नी थोडक्यात बचावले, कुठं झाला भीषण अपघात