नितीन गडकरी यांची धमकी, गडबड कराल तर बुलडोझर खाली… 

| Updated on: Jan 28, 2023 | 10:11 AM

बोलण्यात रोखठोक असणारे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगली येथे एका कार्यक्रमात बोलताना कंत्राटदारांना थेट धमकीच दिली आहे.

सांगली : सांगलीच्या अष्टा येथे पेठ – सांगली रस्त्याच्या चौपदरीकरण भूमिपूजन प्रसंगी बोलताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी कंत्राटदारांना चांगलाच दम भरला आहे. २५ वर्षात रस्त्यावर एखादा खड्डा पडणार नाही असा मजबूत रस्ता तयार करा.

ठेकदारांना सांगतो. तुमच्याकडून मी कधी माल मागितला नाही. तुमच्याकडून कधी एक रुपया घेतला नाही. पण रस्त्याच्या कामात जर गडबड कराल तर थेट बुलडोजर घालू. असा सज्जड दम वजा धमकीच त्यांनी दिली. अर्थात ही धमकी त्यांनी भाषणाच्या ओघात बोलताना मिश्किलपणे दिली आहे.

Published on: Jan 28, 2023 10:11 AM
शिवसेना-वंचित युतीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
कोण संजय राऊत, ते माझ्या पक्षाचे सदस्य नाहीत, ‘या’ नेत्यानं राऊत यांना फटकारलं