लोकसभा निवडणूक 2023मध्ये होणार? काय म्हणाले बिहारचे मुख्यमंत्री?
आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी राज्यात तसेच राष्ट्रीयस्तरावरील पक्षांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक राष्ट्रीय पातळीवर महाआघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी राज्यात तसेच राष्ट्रीयस्तरावरील पक्षांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक राष्ट्रीय पातळीवर महाआघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत.विरोधकांना एकत्र आणण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. याच दरम्यान त्यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. “2024 पूर्वीच देसात लोकसभा निवडणुका होऊ शकतात”, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणूक 2023मध्येच होणाचा अंदाज नितीश कुमार यांनी लावला आहे.
Published on: Jun 15, 2023 10:19 AM