मणिपूरचा मुद्दा चिघळणार; लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल!

| Updated on: Jul 26, 2023 | 12:24 PM

मणिपूरचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या प्रश्नावर संसदेच्या पावसाळी अधिवेशना पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळाटाळ करत असल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आज मोदी सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला आहे.

नवी दिल्ली, 26 जुलै 2023 | मणिपूरचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. मणिपूर मधील हिंसाचाराच्या प्रश्नावर संसदेच्या पावसाळी अधिवेशना पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळाटाळ करत असल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आज मोदी सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्तावर मांडला आहे. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला.संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. दरम्यान मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर सध्या संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरू आहे.

Published on: Jul 26, 2023 12:22 PM
इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांवर शासनाची फुंकर; दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा, 7 एकराची जागा ही मिळाली
‘इंग्रजांची औलाद आहात काय?’, खासदार हेमंत पाटील यांनी अधिकाऱ्याला सुनावले खडेबोल