जुहूच्या घरात एक इंचाचंही बेकायदा बांधकाम नाही
जुहू येथील माझ्या घरात मी एका इंचाचंही बेकायदा बांधकाम केलं नाही. मला बेकायदा बांधकाम करण्याची गरज पडली नाही. माझी इमारत शंभर टक्के कायदेशीर आहे.
मुंबई: जुहू येथील माझ्या घरात मी एका इंचाचंही बेकायदा बांधकाम केलं नाही. मला बेकायदा बांधकाम करण्याची गरज पडली नाही. माझी इमारत शंभर टक्के कायदेशीर आहे. या इमारतीला सीसी आणि ओसी मिळालेली आहे. एकही गोष्ट मी अपूर्ण ठेवली नाही. मातोश्रीच्या (matoshri) सांगण्यावरूनच ही तक्रार करण्यात आली. तसं तक्रारदारानेही स्पष्ट केलं आहे. पण असो. ते आम्हाला चांगल्या आठवणी देत आहेत. सूडाने कारवाई होत आहे. या सर्वांना उत्तर देण्यासाठी मी समर्थ आहे, असा सूचक इशारा केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी दिला. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या घराला मुंबई महापालिकेने (bmc) दिलेल्या घराच्या नोटीशीवरून खुलासा केला.
Published on: Feb 19, 2022 12:23 PM